महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल २०२० पुरस्कृत शालिनी नाजुकराव कुमरे (निंबार्ते) यांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावरील २०२० च्या फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे (निंबार्ते) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दुरस्थ प्रणालीच्या माध्यमातुन आयोजित सोहळ्यात  १५ सप्टेंबर २०२१ ला सन्मानीत करण्यात आले.
वरील सन्मानाच्या अनुषंगाने इंडियन नर्सिंग कौन्सिल द्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार व सामुहिक छायाचित्र काढण्याचे निमंत्रण देण्यात आले. सदर सोहळा ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे पार पडला. शालिनी नाजुकराव कुमरे (निंबार्ते) यांना त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदिर्घ व व्रतस्थ आरोग्य सेवेबद्दल रुग्णालय प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडून अनेकदा कौतुकाची थाप देऊन प्रशस्तीपत्र व मानचिन्हाद्वारे सन्मानीत करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यासारख्या दुर्गम भागात प्रतिकूल परीस्थितीत केलेल्या कार्याचा हा अभिमानास्पद गौरव आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos