कोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
तालुक्यातील कोठारी पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष अंबीके यांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यावसायीकांना चांगलाच चोप दिला आहे. यामुळे येथील अवैध व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत. २५ आॅगस्ट रोजी पेटोलिंगदरम्यान रात्री नागरिकांच्या सहकार्याने इंडीगो कारमधून देशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कवडजई जवळ एक किमी अंतरावर पांढर्या रंगाची इंडीगो कार उभी होती. कोठारीचे ठाणेदार अंबीक, हवालदार रागीट, पेंढारकर, शिपाई बालाजी, हरी मडावी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. कार क्रमांक एमएच ३४ - ७९६६ ची चौकशी केली. यावेळी कारजवळील एक व्यक्ती जंगलात पळून गेला. दोन पंचासमक्ष कारची झडती घेतली. कारमध्ये १९ खोके देशी दारू आढळून आली. या दारूची किमत १ लाख ९० हजार रूपये आहे. कारची किमत ३ लाख रूपये इतकी आहे. कारचा चालक व इतर व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनात कोठारी पोलिस ठाण्याचे ठाणेदारी संतोष अंबीके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-27


Related Photos