महत्वाच्या बातम्या

 चार दिवसीय पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल महिला क्रीडा स्पर्धा संपन्न  


- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत चार संघाचा पश्चिम विभागातून सहभाग

-आजच्या सामन्यात प्रथम खुशालदास (राजस्थान), व्दितीय पुणे, तृतीय एल.एन.आय.टी.ई. व चतुर्थ स्थान नागपूरने पटकाविले

-समारोपीय कार्यक्रमात चमूचा चषक देऊन गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : विद्यापीठ क्रीडा संकुलावर चार दिवस संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत खुशालदास विद्यापीठ प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्दितीय, लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट¬ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वालियर तृतीय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर संघाने चतुर्थ स्थान प्राप्त केले.
आज सावित्रीबाई फुले विद्यापीठ व खुशालदास विद्यापीठ हनुमानगढ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात खुशालदास विद्यापीठाच्या खेळाडूंची कामगिरी वरचढ राहिली. खुशालदासच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत, पुणे विद्यापीठावर मात केली. स्मॅशिंग, ब्लॉकींग, डिफेन्स, लिफ्टींग खुशालदासच्या खेळाडूंची अप्रतिम होती. पुणे विद्यापीठाने खुशालदासला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार सेट पर्यंत हा सामना रंगला, यामध्ये ३ सेट खुशालदास विद्यापीठाने, तर एक सेट पुणे संघाने केला. शेवटी खुशालदास विद्यापीठाने ३-१ ने विजय मिळवून स्पर्धेतील प्रथम स्थान पटकाविले. दुस-या स्थानावर पुणे विद्यापीठ संघ राहिला. तृतीय व चतुर्थ स्थानासाठी एल.एन.आय.पी.ई.ग्वालियर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामन्यात ग्वालियरच्या संघाने नागपूर संघावर ३-१ ने सरळ मात करुन विजय मिळविला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर चार दिवसीय सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल महिला क्रीडा स्पर्धेचा समारोप संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य भाऊसाहेब बेलसरे, विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे, व्हॉलीबॉल असोसिएशन रेफरी बोर्डाचे अध्यक्ष साहेबराव पाटील उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते विजेत्या चमूंना चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाचही जिल्ह्रातील संलग्नीत महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, गठीत विविध समितींचे सदस्य तसेच शारीरिक व क्रीडा विभागातील कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेच्या सर्व पात्र पंचांनी यशस्वीरित्या व तंत्रशुध्द पध्दतीने सामन्याचा निवाडा केला. पंचांच्या विशेष कामगिरीचे कौतुक केल्या गेले. याप्रसंगी संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी प्रास्ताविक केले, तर अजय देशमुख यांनी विजयी संघाला अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी खेळामुळे आयुष्य वाढते असा संदेश देऊन विजेत्या संघाचे अभिनंदन केले.डॉ. विजय पांडे यांनी सूत्रसंचालन केले. तर विजेत्या संघाच्या कप्तान कु. अल्पना तेतरवाल हिने मनोगत व्यक्त करतांना अमरावती विद्यापीठाने उत्कृष्टरित्या केलेल्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले.





  Print






News - Rajy




Related Photos