गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे शहिदांना वाहिली श्रद्धांजली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली जिल्हा तथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समितीचे सदस्य राहुल अर्जुनराव दुबाले यांच्या मार्गदर्शनात २६ नोव्हेंबरला शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम गड़चिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
श्रद्धांजली कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हेमंत जम्बेवार शिंदे गट व राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरड़कर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बडकेलवार, खो - खो प्रशिक्षक प्रवीण बारसागडे यांनी उपस्थिती लावले व शहिदांना श्रद्धांजली वाहिले.
यावेळी हेमंत जम्बेवार यांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. तरी या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस बॉईज गडचिरोली जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप पेदापल्ली व संघटनेचे पदाधिकारी अनुराग कुडकावार, शिवराम पूल्लूरी, मिथुन देवगडे, राकेश बच्चलवार, वैभव सधानशीव, नेहल लोणारे, उमेश झगळकर, आशिक झाडे, प्रीतम साखरे, शर्मीश वासनिक, संदीप मडावी, हरीश चनावार, मंगेश मामुलकर, उपस्थित होते.
News - Gadchiroli