पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांसाठी ५ ऑक्टोबर पासून बँक मेळावे


- पाच तालुक्यांमध्ये पंचायत समितीनिहाय आयोजन
- आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पंचायत समितीनिहाय बँक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये लाभार्थ्यांना बँकिंग प्रक्रियेसह योजनेच्या लाभासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळाव्यास उपस्थित राहताना लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि छायाचित्र सोबत आणावे. संबंधित पंचायत समितीच्या ठिकाणी आयोजित या मेळाव्यांना बँक अधिकारी तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पंचायत समितीनिहाय मेळावे- ५ ऑक्टोबर – नरखेड, ६ ऑक्टोबर – मौदा, ७ ऑक्टोबर – रामटेक, ८ ऑक्टोबर – पारशिवनी आणि ९ ऑक्टोबर – सावनेर असे आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील निर्धारित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




