महत्वाच्या बातम्या

 १२ ऑक्टोबरपासून एटापल्ली नगरपंचायतीतील सफाई काम बंद : कामगारांचे बेमुदत आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी १२ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील कंत्राटदाराकडील थकीत देणी आणि भविष्य निर्वाह निधी (EPF) मधील अनियमिततेबाबत वारंवार लेखी व तोंडी कळवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांच्या वतीने करण्यात आला आहे.

कामगारांच्या थकीत रकमा अदा करणे, EPF मधील अनियमिततेची चौकशी करणे आणि संबंधित प्रश्न तातडीने सोडवणे, या प्रमुख मागण्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने कामगारांना बेमुदत काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकूरवार म्हणाले, सफाई कामगारांच्या थकीत देणी व EPF अनियमिततेकडे वारंवार कळवूनही दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावेत; अन्यथा आयटक कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करेल. कामगारांच्या हक्कांशी तडजोड केली जाणार नाही! 

कामगारांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन थकीत देणी व EPF चा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आयटकच्या वतीने करण्यात आली आहे.





  Print






Related Photos