महत्वाच्या बातम्या

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला नागपूर विभागात उत्स्‌फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यात 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवात 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणीबाबत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. राज्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूर विभागात या अभियानाला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपूर विभागात एकूण 39 लाख चार हजार 816 महिलांची आरोग्य तपासणी करण्यातआली. हे प्रमाण 82 टक्के एवढे आहे. यात 20 नोव्हेंबरपर्यंत भंडाऱ्यातील4, 34,235, चंद्रपूर 7,46,642, गडचिरोली 4,14,138, गोंदिया 4,33,443, नागपूर 6,72,199, वर्धा 3,55,397, नागपूर महानगरपालिका 7,41,486, चंद्रपूर महानगरपालिका 1,07,456 महिलांची तपासणी करण्यात आली. नागपूर विभागात सर्वाधिक लक्ष्यांक चंद्रपूर विभागाने पूर्ण केले आहे. चंद्रपूरने सर्वाधिक 99.78 टक्के लक्ष्यांक आतापर्यंत पूर्ण केले आहे. अजून काही दिवस शिल्लक असून हे अभियान युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos