जनतेच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करा : बेबीताई उईके यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चंद्रपूर शहर जिल्हा संघटनेची मासिक संघटनात्मक बैठक पक्ष कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांसह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या, SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना होत असलेला त्रास या विषयांवर पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी, परीक्षा प्रक्रिया आणि शासनाच्या पातळीवर मांडावयाच्या प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात आली.
पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथस्तरापासून प्रभाग व वॉर्डनिहाय संघटन उभारणी करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे नागरिकांशी संवाद साधावा, तसेच पक्षाच्या विविध सेलच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी केले.
SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मतदार यादीशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासोबतच संबंधित प्रशासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि विविध घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सेलने सक्रिय भूमिका बजावावी, असा निर्धार यावेळी करण्यात आला. आगामी काळात बूथस्तरापासून संघटना अधिक मजबूत करून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस शहर कार्याध्यक्ष सुधाकर कातकर, युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, शहर महिला जिल्हाध्यक्ष नंदिनी गौरकार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष बब्बूभाई ईसा, आदिवासी सेल अध्यक्ष जनार्धन गेडाम, ओबीसी अध्यक्ष विठ्ठल मस्की, सामाजिक न्याय विभाग सेल अध्यक्ष मनीष मोडक, कामगार सेल अध्यक्ष महेश काहीलकर, सेवादल अध्यक्ष विलास नखाते, वकील सेल अध्यक्ष प्रवीण वाकूडकर, ओबीसी महिला अध्यक्ष नंदा शेरकी, युवा नेते अनुप बेले, सरचिटणीस रुपेश मुलकावार यांच्यासह शालिक नागापुरे, परमेश्वर वाघमारे, दिलीप आत्राम, सुभाष नन्नावरे, किशोर कामटकर, सुधाकर चौधरी, आदित्य वैरागगडे, तेजस धोबे, अनिकेत निकोडे, नीलकंठ येरमे, महेंद्र शेरकी, किशोर साखरकर, प्रकाश मेसराम, दीपक वनकर, किशोर राखुंडे, रमेश गणवीर, शोभा घरडे, सरस्वती गावंडे, सुनंदा महाते, कविता घकाते, सुनंदा खोब्रागडे, ज्योती झोडे, सविता राऊत, गीता कावडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




