मुक्तीपथ च्या चामोर्शी तालुका संघटकास विनयभंगप्रकरणी अटक, अॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चामोर्शी :
अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्तीपथ संघटनेच्या चामोर्शी तालुका संघटकास चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे. 
संदिप गोविंद वखरे (२७) रा. हनुमान वार्ड चामोर्शी मुळ मु.पो. झिरपी ता. अंबड जि. जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कलम ३५४ (अ) (१) (२) (४)  भादंवी सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ , सहकलम ३ (२) (w) (i) (३) (२) (अ) अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आरोपी संदीप वखरे याने पिडीत मुलीला मुक्तीपथ संघटनेच्या कामाच्या निमित्ताने १४ आॅगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता बोलावून तिच्या एकटेपणाचा व अल्पवयाचा फायदा घेवून जवळीक साधली. तिचा हात पकडून शरीर संबंधाची मागणी केली. तसेच अश्लिल कृत्य केले. तसेच फिर्यादी मुलीच्या मैत्रीणीसोबतसुध्दा जवळीक साधून लज्जास्पद कृत्य करून लैंगिक छळ केला. सदर कृत्य आरोपीने ३० आॅगस्टपर्यंत केले. याबाबत पिडीत मुलीने चामोर्शी पोलिसांत तक्रार करताच आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-05


Related Photos