प्लॅटिनम ज्युबली हायस्कुलच्या मुजोर कारभारावर लगाम लावा
- वंचित बहुजन आघीडीची शिक्षणाधिका-यांकडे मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल तथा ज्युनियर कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु शाळेतील प्रशासनाच्या मुजोर कारभारामूळे पालक, विद्यार्थी व मुलांना शाळेत सोडणारे ऑटोरिक्षा व व्हॅनवाले हैराण असल्याने शाळेच्या मुजोर कारभारावर लगाम लावण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्ठमंडळाने शिक्षणाधिकारी निकम यांच्याकडे निवेदनातूवन केली.
शिक्षणाधिकारी निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्लॅटिनम ज्युबली स्कुलची वेळ सकाळी पाऊने नऊची आहे त्यामूळे शाळेच्या वेळेपूर्वी अर्धा पाऊन तास आधी जर कोणी आपल्या पाल्यांना सोडून देत असेल तर शाळेचे मेन गेट उघडण्यापर्यंत पाठीवर स्कुल बॅगचे ओझे घेऊन उण, वारा, पाऊस, थंडीमध्ये ताटकळत रहावे लागते तसेच ऑटोरिक्षा व व्हॅनने मुलांना शाळेतून ने-आण केल्या जाते परंतु मुलांना उतरण्यासाठी व बसण्यासाठी सुद्धा शाळेच्या समोर खुप मोठा परिसर असून सुद्धा ऑटोरिक्षा व व्हॅन थांबवू दिल्या जात नाही त्यामूळे ऑटोरिक्षा व व्हॅन हायवे रोडवरच थांबवावे लागते व विद्यार्थ्यांना जीव मूठीत धरून रहदारीचा रोड क्रॉस करावे लागते अशावेळी काही घडलं तर जबाबदार कोण?
या संबंधाने पालकांनी शाळेच्या प्रशासनाची वांरवार चर्चा केली परंतु मुजोर प्रशासन ऐकत नसल्याने शिक्षणाधिका-यांनी लक्ष घालून पालक, विद्यार्थी व ऑटोरिक्षा व व्हॅन वाल्यांना न्याय मिळवून द्यावा व अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख , भारत रायपूरे, दिलीप बांबोळे, जावेद शेख , आबिद शेख आदि उपस्थित होते.
News - Gadchiroli