कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना


-पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाना ४ एकर कोरडवाहु किंवा २ एकर बागायती शेतजमीन १०० टक्के अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती -
अर्जदार हा अनुसूचित जाती/नवबौध्द घटकातील असावा. अर्जदार हा नागपूर जिल्हातील रहिवासी असावा, अर्जदार हा दारिद्र रेषेखालील असावा (दारीद्रय रेषेखालील यादीमध्ये नावाची नोंद आवश्यक), अर्जदार भूमिहीन शेतमजुर असावा, अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ६० वर्षापर्यंत असावी, दारिद्र रेषेखालील विधवा व परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येते, अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्तांना प्राधान्य देण्यात येते.
नागपूर जिल्हातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, श्रध्दानंद पेठ नागपूर येथून अर्ज प्राप्त करून घेऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर येथे सपंर्क साधावा.




Petrol Price




