जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून पुलवामा येथेही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून  एक नागरिक जखमी  आहे.
कुपवाडा येथील कोचलू गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळताच शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाला. दहशतवादी घटनास्थळावरुन पळ काढण्यात यशस्वी झाले असून शहीद जवानाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
दुसरीकडे पुलावामा जिल्ह्यातील अवंतिपूरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यात एक नागरिक जखमी झाला. तर याच जिल्ह्यातील द्रूवगाव येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला.  Print


News - World | Posted : 2018-08-17


Related Photos