महत्वाच्या बातम्या

 नगर पंचायत अहेरी येथे नगराध्यक्षा रोजा करपेत यांच्या हस्ते सिमेंट रोडचे भूमिपूजन


- माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व शैलेंद्र पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक १७ येथे पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट कांक्रेट रोडाचे भूमिपूजन अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोज्या करपेत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र यावेळी सत्ता परिवर्तन होताच सदर समस्याकडे लक्ष देवून नगर पंचायतच्या अण्णा साठे या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आली असून नागरिकांना सोईस्कर होईल. या भूमिपूजन सोहळ्याला मीना ओंडरे बालकल्याण सभापती न.प. अहेरी, जोती साडमेक नगरसेविका अहेरी, सुरेख गोडसेलवार नगरसेविका अहेरी निखत शेख नगरसेविका अहेरी, विलास सिडाम नगरसेवक अहेरी, विलास गलबले नगरसेवक अहेरी, महेश बाकेवार नगरसेवक अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अजय साळवे मुख्याधिकारी न.प.अहेरी, सुजित आमने प्रशासकीय अधिकारी न.प.अहेरी, वैभव पांढरे कर निर्धारक न.प.अहेरी,गोविंदा दुर्गे, आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos