नवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये खवल्या मांजरीची शिकार करणाऱ्या २३ आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
नवेगाव - नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर क्षेत्रामध्ये वनविभाग गोंदिया गुप्त माहितीच्या आधारे  धानोरी गावात कार्यवाही केली असता अतिशय दुर्मिळ असणाऱ्या खवल्या मांजर शिकार केल्याची घटना ९ जुलै  रोजी उघडकीस आली.या प्रकरणी २३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. 
 खवल्या मांजर व इतर वन्यप्राण्यांची शिकार करणे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये प्रतिबंधित केलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर. एम. रामानुजम ,   उपसंचालक अमलेंदू पाठक    मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आर.आर. सदगीर  , वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जी. शेंडगे , वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस. मोडवान , वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडगे , वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले , वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य  व विशेष व्याघ्र संरक्षक दलाचे अधिकारी/ कर्मचारी यांनी केला असून सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण ०२ जिवंत खवले मांजरासह २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 
सदर घटना ०९ जुलै रोजी घडली असून  धानोरी येथे काही आरोपींनी खवले मांजराचा व्यवहार सुरु केला होता. सदर ठिकाणी काही आरोपींना जिवंत खवल्या मांजरासह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर केलेल्या तपासात असे निदर्शनास आले कि, खवल्या खरेदी विक्री करणारे आणखी एक टोळी असून तिच्यामार्फत खवल्या मांजराचा साकोली येथे व्यवहार होणार आहे. त्या अनुषंगाने वन्यजीव विभागाने ३० जुलै रोजी सेंदूरवाफा टोल  प्लाझा येथे सापळा  रचून जिवंत खवल्या मांजर वाहतूक करणाऱ्या टोळीस जेरबंद केले. आतापर्यंत एकूण २३ आरोपींना अटक करण्यात आली असून  प्रथम श्रेणी  न्यायाधीश  सडक अर्जुनी यांनी सदर आरोपींना १४ ऑगस्ट रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 खवल्या मांजर तस्करी प्रकरणात भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील तसेच बालाघाट (मध्यप्रदेश) व राजनांदगाव (छत्तीसगड)जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून वेगवेगळ्या स्तरावर सक्रिय इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. नेहमी वाघाचे दात, नखे, कातडी इत्यादी वास्तूच्या तस्करीबाबत सर्वसाधारण लोकांना माहिती असते. परंतु खवल्या मांजर यासारखा अत्यंत दुर्मिळ व लाजाळू निशाच्चार असणारा प्राणीही वन्यजीव तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात  असल्याचे या प्रकरणावरून निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याच्या सीमावर्ती  भागामध्ये तस्करी करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहेत.  यामध्ये अशिक्षित व अकुशल व्यक्ती पासून उच्च   पदस्थ व्यक्तीही या गुन्ह्यात सामील असून जंगलालगतच्या खेड्यांमधील कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना खवल्या मांजराच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा   मिळतो. अशा प्रकारचे खोटे व चुकीचे आमिष दाखवून अत्यंत दुर्मिळ, लाजाळू व सुंदर प्राण्यांचा नाहक बळी घेतला जात आहे. वन्यप्राण्याच्या शिकारीच्या गुन्ह्यात सात वर्षापर्यंत कैद तसेच आर्थिक दंडाची तरतूद कायद्याने केलेली असून गुन्हा करतांना वापरण्यात आलेले वाहन व इतर साधन सामुग्री सरकार जमा होते. 
करीत वन्यजीव विभागामार्फत सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, खोट्या अफवा व अंधश्रद्धेला बळी न पडत खवल्या मांजर, मांडूळ व इतर जंगली प्राण्यांची शिकार, तस्करी इत्यांदीसारख्या वन अपराधात सामील होऊ नये. पैशाचा पाऊस पडतो या गोष्टीवर नागरिकांनी बिश्वास ठेऊ नये व वन्यजीवांना हानी पोहचवू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.   Print


News - Gondia | Posted : 2018-08-09


Related Photos