धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ बोनस द्या :रमाकांत लोधे, तालुकाध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : कृषिप्रधान देशातील महाराष्ट्रात पूर्व विदर्भात धान उत्पादक शेतकरी शासनाच्या उदासीनतेमुळे नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या चक्रव्युहात अडकलेला धान उत्पादक शेतकरी नेहमीच शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरतो. यावर्षीचे कमी पर्जन्यमान आणि त्यात वाढलेले बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरी, ट्रॅक्टर व इतर अवजार भाडे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासन एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतो परंतु निवडणुकीत केलेली बोनसचा मात्र शासनाला सोयीने विसर पडतो. घामाने कमावलेल्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी शासनाकडे बोनस मिळावा यासाठी आश्वासक चेहऱ्याने शासनाकडे पाहतो आहे, तरी वाढती महागाई आणि भरमसाठ वाढलेल्या उत्पादक खर्चाचा विचार करता तत्काळ धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देउन निवडणुकीतील आपल्या वायद्याची पूर्तता करावी, अशी मागणी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमाकांत लोधे यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मा.तहसीलदार सिंदेवाही विजया झाड़े यांच्या मार्फत निवेदन देउन मागणी केली आहे.
तसेच मागणी पूर्ण न केल्यास बोनस मागणीकरीता शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करु असा इशाराही शासनाला दिला आहे.निवेदन सादर करतांना रमाकांत लोधे, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही , मंगेश मेश्राम,अक्षय पेटकुले, सागर गेडाम, भूपेश लाखे,अशोक सहारे, पंकज मूलकलवार,नरेंद्र भैसारे, रवी कुचनवार इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




Petrol Price




