महत्वाच्या बातम्या

 जन्माष्टमीला वैभव कॉन्व्हेंटमध्ये अवतरले बालकृष्ण


- कृष्ण-राधेच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; मटकी फोडीने रंगला उत्सव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्या प्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.

कृष्णाच्या आकर्षक पोशाखासह मुकुट, बासरी आणि विविध सजावटींनी सजलेले छोटे बालगोपाल शाळेच्या परिसराचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाचे मनमोहक सादरीकरण केले. तसेच मटकी फोडीच्या कार्यक्रमातून जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित केला.

यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य विजय शिंदे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांबद्दल प्रेम व आदराची भावना निर्माण होते, असे सांगितले.

जिथे मुलाच्या हृदयात कृष्णाचे हास्य असते, तिथे रोज जन्माष्टमीचा उत्सव असतो, असा संदेशही यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका राखी तुमराम यांनी केले, तर शिक्षक सुमन प्रजापती यांनी आभार मानले.  कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





  Print






Related Photos