अल्पवयीन मुलीवर २९ वर्षीय युवकाचा अत्याचार : आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित तरुणाने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी २९ वर्षीय युवक विरुद्ध कारवाई करून अटक केले.
प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या आई, आजी आणि लहान भावासोबत भाड्याच्या घरात राहते. मागील चार-पाच महिन्यांपासून शेजारी राहणाऱ्या युवकाशी तिची ओळख झाली होती.
ऑगस्ट महिन्यात आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी घरात कोणीही नसताना त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. बदनामीच्या भीतीने मुलीने ही बाब त्यावेळी कुणालाही सांगितली नाही.
दरम्यान, ३ सप्टेंबर रोजी मुलगी आईसोबत गावाला जाणार असल्याची माहिती तिने आरोपीला दिली होती. त्याच दिवशी सकाळी आरोपीने तिला फोन केला. त्यानंतर मुलगी त्याच्या घरी गेली असता घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. तसेच, ही घटना कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या अवस्थेत मुलगी काही वेळ आरोपीचा घरीच राहिल्यानंतर आपल्या घरी परतली. आई घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईसोबत बल्लारपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी आरोपी विरुध्द पॉस्को तसेच बी एन एस अत्याचार कायदा अंतर्गत कारवाई करत आरोपीला ३ सप्टेंबर रोजी अटक केले. आरोपीला ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहे.




Petrol Price




