महत्वाच्या बातम्या

 दिवाळीच्या मुहूर्तावर ३ हजार ८२८ माथाडी कामगारांना ५ कोटी ६० लाख बोनस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्य सरकारच्या कामगार मंत्रालयांतर्गत नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळामार्फत कार्यरत असलेल्या 3 हजार 828 माथाडी कामगारांना दिवाळी बोनस(सानुग्रह अनुदान) 5 कोटी 59 लाख 90 हजार 113 रुपये माथाउी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. कामगारांना बोनस मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

विदर्भाचे अप्पर कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांच्या मार्गदर्शनात माथाडी मंडळात काय्ररत 3 हजार 828 माथाडी कामगारांना मागील वर्षाकरिता हे बोनस वाटप करण्यात आले, असे नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष राजदीप धुर्वे व सचिव एम.पी. मडावी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos