महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याक संवाद यात्रा उत्साहात बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याक संवाद यात्रा उत्साहात


- शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर साधला थेट संवादविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुरात अल्पसंख्याक संवाद यात्रा उपक्रम उत्साहात पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक विश्रामगृह येथे ५ सप्टेंबर रोजी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. अल्पसंख्याक समाजाला पक्ष संघटनेशी जोडणे, तसेच शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करून समस्या शासनदरबारी मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अल्पसंख्याक ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात चोरी : ६१ हजार ९०५ रुपयांची रोकड लंपास बातम्या - Chandrapur

लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात चोरी : ६१ हजार ९०५ रुपयांची रोकड लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६१ हजार ९०५ रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता शाळा बंद करून शिक्षक व कर्मचारी घरी गेले होते. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता शाळा उघडण्यात आली असता कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. कार्यालयात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले तसेच कपाट आणि टेबलांची तोडफोड झाल्याचे दिसून आले.त्यानंतर शाळेतील विविध टेबल व कपाटांची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. या घटनेत एकूण ६१ हजार ९०५ रुपये चोरीला गेल्याचे समोर आले.दरम्यान, अज्ञात चोरट्याने ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सैनिक स्कूल चंद्रपूरचे राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद बातम्या - Chandrapur

सैनिक स्कूल चंद्रपूरचे राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद


- आठ दिवसांच्या स्पर्धेत कॅडेट्सची दमदार कामगिरी , विजापूर संघ उपविजेताविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल्स नॅशनल गेम्स गट जी स्तरावरील क्रीडा व साहित्यिक स्पर्धांचा गुरुवारी ३ उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. तब्बल आठ दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नऊ नामांकित सैनिक शाळांमधील छात्र सैनिकांनी (कॅडेट्स) सहभाग घेत विविध क्रीडा व साहित्यिक स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चमक दाखवली. या स्पर्धेत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धांमध्ये सहभागी कॅडेट्सनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धांमध्ये रंगत आणली.बास्केटबॉलमध्ये चंद्रपूरची बाजी -मुलांच्या तसेच मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत यजमान सै...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नाराजी बातम्या - Chandrapur

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नाराजी


- सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडण्याची भीती : जुनी मीटर व्यवस्था कायम ठेवण्याची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / भद्रावती : महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या स्मार्ट विद्युत मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज वापराची नोंद करण्याची प्रक्रिया राबविली जात असली, तरी या योजनेमुळे सर्वसामान्य तसेच गोरगरीब ग्राहकांवर भविष्यात आर्थिक बोजा पडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच यापूर्वी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून पूर्वीचीच मीटर व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी नगरसेवक राहुल सोनटक्के यांनी केली आहे.यासंदर्भात सोनटक्के यांनी महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन शहरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या मोहिमेबाबत नागरिकांच्या भा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कोठारी ग्रामपंचायतीसमोर तरुणांचा एल्गार बातम्या - Chandrapur

कोठारी ग्रामपंचायतीसमोर तरुणांचा एल्गार


- हिशेब द्या, प्रश्न सोडवाचा सूर : विशेष ग्रामसभेसाठी जेन-झीचा ठिय्याविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गावाच्या विकासाचा गाडा नेमका कुठे अडला आहे, ग्रामस्थांकडून वसूल होणाऱ्या करांचा विनियोग कसा होतो आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जाते, या प्रश्नांनी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतीसमोर आता वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित करीत गावातील जेन-झी तरुणांनी ५ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांची यादीच तरुणांनी प्रशासनासमोर ठेवली आहे. पाणीपुरवठ्याची समस्या, नळ जोडणी नसतानाही आकारली जाणारी पाणीपट्टी, भरलेली घरपट्टी पुन्हा आकारली जात असल्याचा आरोप, गावातील तसेच महामार्गावरील आठ पथदिवे अद्याप प्रलंबित असणे, यामुळे ग्रामस्थांमध्ये ना...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची भूमिका : वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात बातम्या - Chandrapur

विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची भूमिका : वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिक व शिपाई यांच्या भूमिका साकारत एक दिवसासाठी शाळेची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला बल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर, संस्थापिका रझिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिनासह स्वयंशासन दिन उत्साहात बातम्या - Chandrapur

महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात शिक्षक दिनासह स्वयंशासन दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यात संस्कार, मूल्ये, शिस्त आणि योग्य दिशादर्शनाची भावना निर्माण करतात, असे यावेळी नमूद करण्यात आले.स्वयंशासन दिनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक तसेच प्रशासकीय पदांची जबाबदारी स्वीकारून महाविद्यालयीन कामकाजाचा प्रत्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पोंभुर्ण्यात ठाकरे गटाचे ऑपरेशन यशस्वी : शिंदेसेनेतील दोन पदाधिकारी गळाला बातम्या - Chandrapur

पोंभुर्ण्यात ठाकरे गटाचे ऑपरेशन यशस्वी : शिंदेसेनेतील दोन पदाधिकारी गळाला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी घडामोड समोर आली आहे. शिंदेसेनेचे युवासेना तालुका प्रमुख रजत ढोंगे आणि शिवसेना तालुका संघटक सचिन मडावी यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. विशेषतः आगामी नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेतील पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग : ५० वर्षीय आरोपीला न्यायालयीन कोठडी बातम्या - Chandrapur

अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग : ५० वर्षीय आरोपीला न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरात घुसून अल्पवयीन मुलीच्या शेजारी झोपत तिच्याशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना बल्लारपूर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.प्राप्त माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या परिवार सह बल्लारपूर परिसरात राहते. २ सप्टेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तिचा भाऊ कामावर गेला, तर पीडित मुलगी आणि तिची बहिण घरातील एका बेडवर झोपल्या. घराच्या मुख्य दरवाजाला कुंडी नसल्याने दरवाजा केवळ ढकलून ठेवण्यात आला होता.३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या शेजारी बहिणीव्यतिरिक्त अन्य व्यक्ती झोपल्याचे जाणवले. तिने डोळे उघडून पाहिले असता शेजारी राहणारा आरोपी असल्याचे दिसले. तिने आरडाओरड करताच तिची बहिण जागी झाली. त्यानंतर आरोपी उठून घ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शिक्षक वडिलांच्या स्मृतींना लेखणीची मानवंदना : ३५० विद्यार्थी व शिक्षकांना पेन भेट बातम्या - Chandrapur

शिक्षक वडिलांच्या स्मृतींना लेखणीची मानवंदना : ३५० विद्यार्थी व शिक्षकांना पेन भेट


- शिक्षक दिनी आगळावेगळा उपक्रम विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील जिल्हा परिषद (माध्यमिक शाळा) हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शनिवारी आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम पार पडला. आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मृती जपत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शिक्षकांच्या मुलांनी एकत्र येत शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी तीन पेन भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गडचिरोली शहरातील जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या या शाळेत शिक्षण घेऊन याच शाळेत शिक्षक म्हणून आदर्श सेवा बजावलेल्या स्व. बी. डी. धकाते, स्व. मनोहरराव कोपुलवार, स्व. संभाजी होकम, स्व. प्रभाकरराव रोटकर आणि स्व. देवराव नगराळे यांच्या मुलांनी शिक्षक दिन आपल्या वडिलांच्या स्मृतींना समर्पित केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची संकल्पना शासकीय ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →