महत्वाच्या बातम्या

 जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्जाबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा जात पडताळणी कार्यालयाच्यावतीने सेवा पंधरवाड्या निमित्त एक दिवसीय जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्जाबाबत वर्धा व पुलगाव येथील महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  

न्यू आर्ट्स सायंन्स ॲन्ड कॉमर्स महाविद्यालय वर्धा येथे व रंगलाल केजडीवाल हायस्कुल ॲन्ड ज्यु. कॉलेज पुलगाव येथे आयोजित एक दिवसीय जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाविद्यालयांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य शरद चव्हाण तसेच संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जी.बी. वाकोडे यांनी मार्गदर्शन केले. 

या शिबिरास महाविद्यालयीन ईयत्ता 11 वी व 12 वीचे विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना बार्टीच्या संकेतस्थळाची व ऑनलाईन फार्म भरण्याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या विविध शंका व अडचणीबाबत निरसन करण्यात आले. वर्धा येथे आयोजित शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ससनकर, चंद्रकांत झिलपे तर पुलगाव येथील शिबिरास प्रा. एस. यु. गोरडे, उपप्राचार्य संजय सहारे, सुनिल भोयर, महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. पुलगाव येथील शिबिरास 4 महाविद्यालयातील 238 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाकरीता कार्यालयातील अखिल चांदुरकर यांनी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos