रापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून ! भंगार बसेसचे काही होणार काय?


- चंद्रपूर - गडचिरोली प्रवासादरम्यानचा अजब प्रवास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्य परिवहन महामंडळाने तिकीटदर वाढवूून प्रवाशांच्या खिशाला ’झळ’ तर लावली मात्र बसेसची ‘गळ’ काही बंद केली नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गळक्या बसमधून प्रवास करतांना प्रवाशांना रेनकोट, छत्रीचा वापर करावा लागत असल्याचा प्रकार आज चंद्रपूर - गडचिरोली बसमध्ये पहावयास मिळाला आहे.
चंद्रपूर येथून येत असलेल्या एमएच ४० एन - ९६११ या क्रमांकाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमधून पाणी गळत असल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. यामुळे एक प्रवासी चक्क रेनकोट घालूनच बसमध्ये बसला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या अनेक बसेस भंगार अवस्थेत आहेत. अशाही परिस्थितीत बसेस लांब पल्ल्यावर सोडल्या जात आहेत. चंद्रपूर - गडचिरोली मार्गाचे काम सुरू असून भंगार बसमुळे आधीच त्रास होत असताना आता पावसाळ्याच्या दिवसात गळक्या बसमुळे बसमधून प्रवास करताना पावसात भिजण्याचा सुध्दा आनंद नाईलाजास्तव घ्यावा लागत आहे. अशा भंगार बसेसचे राज्य परिवहन महामंडळ काही करेल काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-17


Related Photos