सावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी
: सावळीविहीर येथील नगरमनमाड रोडवर असलेल्या महाविर होम सोलुशन (फर्निचर टाउन) या शोरुमला शाॅट सर्किट मुळे आग लागल्याने सव्वा दोन कोटीचे नुकसान झाल्याची माहिती  ऋषभ चौरडीया यांनी दिली आहे. 
 ९ ऑगस्ट रोजी  रात्री ९ ते ९.३० वाजे दरम्यान बंद असलेल्या महाविर होम सोलुशन  (फर्निचर टाउन) ला आग लागल्याने मोठी धावपळ उडाली . स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.  या वेळी शिर्डी साईबाबा संस्थान. कोपरंगाव संजिवनी साखर कारखाना  येथिल अग्नीशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  दुकानाचे शटर उघडुन अग्नीशमन दलाने प्रेशरणे पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.  इलेकट्रीकल वस्तु व फर्निचरने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने दोन तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आली . मात्र या आगी मध्ये ७०ते८०टक्के मालाचे नुकसान झाले.  या बाबत  ऋषभ चौरडीया यांनी दोन ते सव्वा दोन कोटीचे नुकसान झाल्याचे सांगुन लोकप्रतिनिधी.व शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी केली आहे 
 सावळीविहीर व पंचक्रोशीत नावजलेले या फर्निचर टाउने कमी कालावधीत नामांकित कंपनीच्या वस्तु संदर्भात मोठा नावलोकीक मिळवला होता.  अंदाजे दोन वर्षा पुर्वी  नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या फर्निचर टाउन माॅलचे उदघाटन केले . या टाउन हाॅल मध्ये इलेक्ट्रीक वस्तु मध्ये L.C.D TV.वाॅशींग मशीन.र्फिज.प्लास्टिक खुर्ची.लाकडी खुर्ची.सोफा सेट.डायनिंग टेबल.कपाट.शोकेस व विविध फर्निचर.प्लास्टिकच्या वस्तु अशा विविध वस्तूंचा समावेश होता.   Print


News - Rajy | Posted : 2018-08-10


Related Photos