महत्वाच्या बातम्या

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रीत


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना सन 2022-23 अंतर्गत जिल्हयास वार्षिक कृति आराखडा मंजुर झाला असुन या योजनेअंतर्गत खाली नमुद केलेल्या घटकांकरीता शेतक-यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुटी फुले एकुण खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त रू. 0.16 लाख प्रति हेक्टर, पॅक हाऊस एकुण खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त रू. 2 लाख (लाभधारक शेतक-यांकडे भाजीपाला किंवा फळपिक लागवड आवश्यक), हळद लागवड एकुण खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त रू. 0.12 लाख प्रति हेक्टर, मिरची लागवड एकुण खर्चाच्या 50 टक्के जास्तीत जास्त रू. 0.12 लाख प्रति हेक्टर, प्लास्टीक मल्चिंग एकुण खर्चाच्या जास्तीत जास्त 50 टक्के रू. 0.16 लाख प्रति हेक्टर, ड्रॅगन फ्रुट लागवड एकुण खर्चाच्या 40 टक्के जास्तीत जास्त रू. 1.60 लाख प्रति हेक्टर तिन वर्षात देय अनुदान, हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के (710 रू. प्रति चै.मी.), सामुहिक शेततळे 24 24 4 मी. आकारमानासाठी रू. 1.75 लाख 34 34 4.7 मी. कारमानासाठी रू. 3.39 लाख, ट्रॅक्टर (8 ते 30 पी.टी.ओ. एचपी) जमिन धारनेनुसार मोठे शेतकरी रू. 0.75 लाख व जमिन धारनेनुसार सर्वसाधारण प्रवर्गातील अल्प, अत्यल्प, अनु. जाती, जमाती व महिला शेतकरी यांना रू. 1 लाख. (लाभधारक शेतक-यांकडे भाजीपाला किंवा फळपिक लागवड आवश्यक)

शेतकरी बांधवांनी उपरोक्त घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडुन अर्ज सादर करावा. यासाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यास ईच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन डॉ. अर्चना कडु, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांचेकडुन करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos