महत्वाच्या बातम्या

 शाळेच्या शौचालयात जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात जिवंत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी, १ नोहेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७ वाजता ही घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी शाळा परिसरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आल्याने नागरिकांनी पाहणी केली. त्यांना शाळेच्या शौचालयात रक्ताने माखलेले बाळ दिसून आले. नागरिकांनी लागलीच त्याला सौंदड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बाळाचे वजन २.५० किलोग्राम असल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर नागरिकांनी डुग्गिपार पोलिसांना याबाबत माहिती दिली.या घटनेमुळे गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. जिवंत नवजात बाळ फेकून देणारे क्रूर पालक कोण?, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. सध्या नवजात अर्भक गोंदिया येथील बाई गंगाबाई महीला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. राका गावात तपास सुरू आहे. लवकरच सत्य समोर येईल, असे डुग्गिपारचे पोलीस निरीक्षक सचिन वांगळे यांनी सांगितले.





  Print






News - Gondia




Related Photos