वडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
वडसा - लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ कारखाना व कारमेल अॅकेडमी दरम्यान रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज ८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.  
स्वप्नील राउत (२१) रा. ब्रम्हपुरी असे ठार झालेल्या युवकाचे तर सुरज युवराज नहामुर्ते (२१) असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे. दोघेही लाखांदूर मार्गाने एमएच ३४  एएस ६८०२ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने येत होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात कशाने घडला हे कळू शकले नाही. मात्र दुचाकी स्वप्नील चालवित होता असे सुरजने सांगितले आहे. 
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मांडवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुरजला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचा पाय आणि हात तुटला असल्याची माहिती आहे. त्याला ब्रम्हपुरी येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. स्वप्नील याचे प्रेत शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले. घटनेचा तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत. यावेळी वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिस दिलीप कांबळे आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-08


Related Photos