महत्वाच्या बातम्या

 नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसची  मोर्चेबांधणी : बल्लारपूरात निवडणूक आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रचाराची तयारी सुरू केली असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बल्लारपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. कबीर लॉन येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे होते. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार ॲड. अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणे, प्रचाराचे नियोजन करणे आणि संघटनात्मक पातळीवर समन्वय साधणे, या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांच्या उपस्थितीमुळे बैठकीला पक्षीय स्वरूप प्राप्त झाले.

या वेळी माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, सिनेट सदस्य दीपक धोपटे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन भगत, भास्कर माकोडे, नगरसेवक ईश्माईल ढाकवाला आणि माजी नगराध्यक्ष छाया मडावी उपस्थित होते.

तसेच नगर सेवक पवन मेश्राम, नगर सेविका शिल्पा चुटे, वैष्णवी जुमडे, मोना धानोरकर, वैशाली हूमने, करुणा रेब्बावार, सुनीता जिवतोडे, प्रियंका थुलकर, अंकुबाई, ॲड. मेघा भाले, आर. आर. यादव, नरेश मुंदडा, डेव्हिड कामपेल्ली, कैलाश धानोरकर आणि शाहिद शेख यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि पदवीधर मतदारही या बैठकीला उपस्थित होते.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. अभिजित वंजारी यांना पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षसंघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूरातील बैठकीत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून प्रचाराची तयारी व संघटनात्मक समन्वयाचा आढावा घेण्यात आला.





  Print






Related Photos