महत्वाच्या बातम्या

 जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सभा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रावर जमा करुन संबंधित समितीकडे तात्काळ सादर करण्यासाठी जिल्ह्यात बार्टी अंतर्गत कार्यरत जिल्हा प्रकल्प अधिकारी व समतादूत यांच्या सभेचे आयोजन करणत आले होते.  बैठकीला उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य शरद चव्हाण, जिल्हा प्रकल्प अधिकारी, समतादूत व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. समाज कल्याण आयुक्तालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडणगड पॅटर्न राबवून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos