खमनचेरू प्रा.आ. उपकेंद्रातील आरोग्य सेविकांच्या गैरहजेरीची चौकशी करा


- नागरिकांचे जि.प. उपाध्यक्षांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नाहीत. तसेच नेहमीच गैरहजर असतात. यामुळे चौकशी करून बदली करण्यात यावी तसेच दुसऱ्या आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खमनचेरू येथील प्रा.आ. उपकेंद्रात दहागावकर आणि गुडपवार ह्या आरोग्य सेविका कार्यरत आहेत. मात्र त्या मुख्यालयी राहून सेवा देत नाहीत. तसेच नेहमीच गैरहजर राहतात. यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. तसेच रूग्णांना त्या वागणूक सुध्दा योग्यप्रकारे देत नाहीत. यामुळे परिसरातील अनेक गावातील रूग्ण त्रस्त झाले आहेत. खमनचेरू येथे आश्रमशाळा असून येथील विद्यार्थी सुध्दा आजारपणात उपकेंद्रात येतात. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार केला जात नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आरोग्य सेविकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा पाच दिवसानंतर उपकेंद्राला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
निवेदन देताना पोलिस पाटील दादाराव मडावी, उपसरपंच रमेश मडावी, दिवाकर मडावी, बोंदा करपेत, शारदा चुनारकर, बंडू मडावी, प्रभाकर मडावी, दिनेश मडावी, आनंद मडावी, संजय सिडाम, अजय सिडाम, अजय मडावी, पोचु मडावी, सोमा आलाम, मुकेश सिडाम, मारोती मडावी, तुकाराम कोडापे, सुरज मडावी, दिवाकर मडावी, दिनेश मडावी, सुनिल सिडाम यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2018-08-08






Related Photos