लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
शहरातील ग्रामीण रुग्णालय मागील शांती नगर परिसरातील अल्पवयीन मुलीला रेल्वे वॉर्ड बल्लारपुरातील रहिवासी असलेल्या आरोपीने मुलगी अल्पवयीन आहे. असे माहित असतांना सुद्धा त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत मागील दोन वर्षांपासून अनैतिक शारीरिक संबंध प्रस्तापित करून तिला गर्भवती केले. हरीब श्रावण उईके (३०) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . 
मुलीच्या आईने दिलेल्या  फिर्यादी वरून मुलगी अल्पवयीन आहे,असे  माहित असताना तिला लग्नाचे अमिष दाखवून मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्तापित करून तिला गर्भवती केले. ती गरोदर होऊन घरीच बाळाला जन्म दिला व बाळ मरण पावले. पीडित मुलीची प्रकृती ठीक नसल्याने व तिला रक्त स्त्राव अधिक झाल्याने तिला सरकारी दवाखाना चंद्रपूर उपचाराकरिता भरती करण्यात आले असून तिथे पीडित मुलीचा उपचार चालू आहे . आईच्या तक्रारीवरून आरोपी हरीब श्रावण उईके याला अ.क्र. ९८२/१८ कलम ३७६ (एन),४१७ भादंवि पास्को अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी ला अटक करण्यात आली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-03


Related Photos