आरोग्य शिबिरात ५१ जणांचे रक्तदान


- जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा काँग्रेसच्या वतीने १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी तपासणीनंतर नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.
तसेच नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने शिबिराचा उद्देशही साध्य झाला.
या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जीवन नाट,अॅड. दुष्यंत किरसान, नगरसेवक सतीश विधाते, कुसुम अलाम, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, शरद ब्राह्मणवाडे, राजेश ठाकूर, परसराम टिकले, दिलीप घोडाम, विजय लाड, अनिल कोठारे आदी उपस्थित होते. रक्तदानासोबतच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देणारे हे शिबिर सामाजिक उपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले




Petrol Price




