सोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार


- मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनपर प्रमाणपत्र देवून केला गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: राज्य शासनाच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या सोशल मिडीया महामित्र उपक्रमात भाग घेवून गडचिरोली क्षेत्रातून महामित्र ठरलेले विदर्भ न्यूज एक्सप्रेस चे संपादक मनिष कासर्लावार यांचा आज १५ आॅगस्ट रोजी  स्वातंत्र्य दिनी  राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. मनिष कासर्लावार यांना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदनपर प्रमाणपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मनिष कासर्लावार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे आदी उपस्थित होते. 
राज्य शासनाच्या वतीने राज्यात सोशल मिडीया महामित्र हा उपक्रम राबविण्यात आला होता. सोशल मिडीयाचा वापर करून समाजामध्ये विवेक संदेश पोहचविण्याच्या या उपक्रमात मनिष कासर्लावार यांनी भाग घेवून राज्यस्तरीय चर्चेत सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सोशल मिडीयाबाबत विविध बाबींवर चर्चा केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. याबद्दल मनिष कासर्लावार यांनी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अनुलोमचे संदीप लांजेवार, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी आदींचे आभार मानले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-15


Related Photos