महत्वाच्या बातम्या

 राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ : या जिल्ह्यात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ जिल्ह्यात दोन दिवसांसाठी यंदा परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दहा वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या पुणे, मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हवामान खात्याकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे. दर दुसरीकडे गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाणे परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. तसेच ठाणे, रायगड पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच सांगलीतील जत तालुक्याला परतीच्या पावसानं झोडपले. जोरदार पावसामुळे कोरडा नदीला पूर आला. तर कशालिंगवाडी ते कोसारीच्या मार्गावर असलेला पूल पाण्याखाली गेला. परिणामी या गावांचा संपर्क तुटलाय. संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं सुरुवात केलीय. 16 दिवसाच्या पावसाची सरासरी तब्बल 271 टक्के इतकी झाली. ऑक्टोबर मध्येही संभाजीनगरचे नागरिक पावसाचा अनुभव घेतायत. या पावसामुळे पिकांचं मात्र प्रचंड नुकसान झालंय. शिरूर तालुक्यातल्या नागर गावातून लिभोळ वस्तीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. 400 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता किंवा पुल नसल्यानं ग्रामस्थांना कमरे इतक्या पाण्यातून वाट काढावी लागतेय. भंडाऱ्यात परतीच्या पावसामुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोंढा कोसरा भागातील धान शेती पाण्याखाली गेलीय. दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करून शेतकरी आपली दिवाळी आनंदात साजरी करणार होते. मात्र आनंदावर विरजण पडलंय.





  Print






News - Rajy




Related Photos