तण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  कुरखेडा
: शेतात तण नाशकाची फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाला आहे.  गुरुदत्त कोवे (४५) रा. चिरचाडी   असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना आज २४ ऑगस्ट रोही सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास   घडली. 
गुरुदत्त कोवे हे आज सकाळी गावालगत असलेल्या आपल्या शेतात तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. त्यांनी पिकावर 'टॉप ऑप ५३' नामक तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर ते घरी परतले. काही क्षणातच त्यांची छाती भरून आली. श्वाच्छोश्वास घेताना त्यांना त्रास होऊ लागल्याने लगेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुदत्त कोवे  शवविच्छेदनानंतर गुरुदत्त कोवे यांच्या  मृत्यूचे खरे कारण कळेल.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-24


Related Photos