महत्वाच्या बातम्या

 डाटा ऑपरेटर पदाकरीता अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रकल्प अधिकारी अकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता डाटा ऑपरेटर म्हणुन सुशिक्षीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची मानधनावर नेमणुक करणे. (प्रति दहा महिन्याकरीता) उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. पदवी/पदव्युत्तर धारक असावा. एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र, इंग्रजी टायपींग श.प्र.मि. ४० व मराठी टायपींग श.प्र.मि.३० प्रमाणपत्र असावा. गोंडी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मागील (२०२४-२५ व २०२५-२६ मध्ये) वर्षी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे काम केलेचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी हा प्रकल्प कार्यालय, गडचिरोली कार्यक्षेत्रातील/ पुढील तालुक्यातील असणे अनिवार्य आहे- गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चार्मोशी, धानोरा व वडसा इत्यादी पात्रता असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहे. 

तरी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया, एल.आय.सी. ऑफिसजवळ, गडचिरोली येथे सादर करावे. असे आवाहन अरुण एम. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.





  Print






Related Photos