महत्वाच्या बातम्या

 अवैध गोवंश वाहतुकीवर पडोली पोलिसांचा छापा : ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पडोली पोलिसांनी कारवाई करत तीन गोवंशीय जनावरांसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १५ सप्टेंबर २०२६ रोजी पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून पिकअप वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहन व तीन गोवंशीय जनावरे असा अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी शिवनगर वॉर्ड, घुग्घुस येथील अनिमुद्दीन गुलबुद्दीन शेख २४ वर्ष याच्याविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(डी), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५, ५(अ), ५(ब), ९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ११९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पडोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ प्रेमदास टेकाम, पोअं गोपीनाथ नरोटे, विठ्ठल राठोड यांनी केले. प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos