एकाच झाडाला गळफास घेऊन आत्या- भाचीने संपवली जीवनयात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / हिंगोली :
  एकाच झाडाला विवाहित सख्या आत्या-भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे घडली . या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे राहणाऱ्या सीमा बालाजी राठोड (२०) व निकिता राजू राठोड (१९) असे मृतक  सख्ख्या आत्या-भाची चे नावे आहेत . 
त्या दोघी कपडे धुण्यासाठी गावाजवळील नाल्यावर गेल्या होत्या. परंतु खूप उशीर झाला तरी त्या परत आल्या नसल्याने घरच्यांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास दोघी जणी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यानंतर नातेवाइकांनी आखाडा बाळापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे आदींनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पंचांसमोर मृतदेह खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह बाळापूर रुग्णालयात हलवले.

   Print


News - Rajy | Posted : 2018-09-03


Related Photos