अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई : ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाविरुद्ध वडनेर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आर्वी छोटी परिसरात २५ तारखेला करण्यात आली. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपीचंद महादेव डफ ४५ वर्षे रा. आर्वी छोटी, ता. हिंगणघाट हा एमएच ३२ एच ३१८४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसतानाही तो वाळूची वाहतूक करीत असल्याचे समोर आले.
या प्रकरणाची दखल घेत वडनेर पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवायांना महत्त्व दिले जात आहे.




Petrol Price




