महत्वाच्या बातम्या

 महिलांमध्ये संताप : दारू विक्रेत्यांना अटक करा


-संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलढाणा ( खामगाव शेगाव ) : खामगाव शहराजवळी गिरली पिंपळगाव नाथ  गावातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्याप्त असून अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी घेऊन सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे. गावात बरेच वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैध दारू विक्रेते कधी दोन अडीच वर्षे तर कधी चार ते पाच वर्षे बंद, यानंतर पुन्हा ही अवैध दारू विक्री सातत्याने सुरू करतात. त्यामुळे जेव्हा पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई-वडिलांना मारहाण करून घरातील धान्ये व भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. आजची नवीन पिढी अवघ्या १२ ते २० वर्षे वयोगटातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत.
ही अवैध दारू विक्री किती वेळा बंद व किती वेळा सुरू होत राहील, असा सवाल तेढा येथील महिलांनी उपस्थित केला आहे. या विक्रेत्यांविरूद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे. येथील अवैध दारू विक्री १०० टक्के बंद व्हावी यासाठी १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय खामगाव येथे निवेदन देण्यात आले.  






  Print






News - Rajy




Related Photos