महत्वाच्या बातम्या

 प्रस्तावित भंडारा टेंट सिटी विंटर फेस्टिव्हलच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा पर्यटकांसमोर आणण्याच्या उद्देशाने  प्रस्तावित असलेल्या भंडारा टेंट सिटी विंटर फेस्टिव्हल २०२६ च्या तयारीचा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला पियुष भिलेगावकर,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक विवेक बेंद्रे, अश्विनी बन्सोड, तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते. मौदी अ‍ॅक्वा पर्यटनस्थळ तसेच रावणवाडी येथील पर्यटनविषयक कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित टेंट सिटीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांची माहिती यावेळी घेण्यात आली.

फेस्टिव्हलच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. पर्यटनस्थळांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते तसेच इतर मूलभूत बाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिल्या.





  Print






Related Photos