महत्वाच्या बातम्या

 मित्र परिवारातर्फे गणेशोत्सव, दुर्गोत्सव व शारदोत्सव मंडळांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील गणेशोत्सव, दुर्गादेवी उत्सव आणि शारदादेवी उत्सवात आकर्षक सजावट, देखावे, शिस्त, सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळांचा राजूभाऊ मित्र परिवाराच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील नगराध्यक्षांसह मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मंडळांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि बक्षीस प्रदान करण्यात आले.

बल्लारपूर शहरात उत्सवांची परंपरा अधिक समृद्ध व्हावी, मंडळांनी सामाजिक उपक्रमांसह देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करावे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राजूभाऊ मित्र परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

या सोहळ्यात बल्लारपूरच्या नगराध्यक्षा डॉ. अलका वाढई, राजुरा चे अरुण धोटे, मुल चे एकताताई समर्थ, गडचांदुर चे निलेश ताजने, घुग्गुस चे दीप्तीताई सोनटक्के यांच्यासह घनश्याम मुलचंदानी, राकेश सोमानी, अरुण वाघमारे, वसंत खेडेकर आणि राजू झोडे यांच्या हस्ते विविध मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गणेशोत्सवातील सर्वश्रेष्ठ मंडळाचा प्रथम पुरस्कार लोकमान्य टिळक मंडळ, बल्लारशाह यांना, द्वितीय पुरस्कार अष्टविनायक गणेश मंडळ, साईबाबा वार्ड यांना, तर तृतीय पुरस्कार किल्ला हनुमान व्यायामशाळा आणि शिव गणेश मंडळ, सरदार पटेल वार्ड यांना देण्यात आला.

सर्वश्रेष्ठ गणपती सजावट विभागात प्रथम पुरस्कार बाळकृष्ण व्यायामशाळा, गांधी वार्ड यांना, द्वितीय पुरस्कार न्यू सम्मित्र गणेश मंडळ, गांधी वार्ड यांना, तर तृतीय पुरस्कार नव बाल गणेश मंडळ, साईबाबा वार्ड यांना प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ दुर्गादेवी मंडळ विभागात न्यू बाल दुर्गा मंडळ, सरदार पटेल वार्ड यांना प्रथम, जय भवानी दुर्गा मंडळ, बीटी प्लांट यांना द्वितीय, तर एकता नवदुर्गा मंडळ, शिवाजी वार्ड यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.

सर्वश्रेष्ठ शारदादेवी मंडळ विभागात तरुण उत्साही मंडळ, शिवाजी वार्ड यांना प्रथम पुरस्कार, बाल शारद महिला मंडळ, गांधी वार्ड यांना द्वितीय पुरस्कार, तर गुरुदेव शारदा महिला मंडळाला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ देवी सजावट विभागात न्यू युवा दुर्गा मंडळ, दत्त मंदिर यांना प्रथम, संस्कार दुर्गा मंडळ, कन्नमवार वार्ड यांना द्वितीय, तर इंदिरा दुर्गा मंडळ, सातनाल चौक यांना तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय नवयुवक दुर्गा मंडळ, गोरक्षण वार्ड, सार्वजनिक दुर्गा मंडळ, सातनाल चौक, सनातन नवदुर्गा मंडळ, शिवाजी वार्ड,  महाकाल गणेश मंडळ, श्रीराम वार्ड, विदर्भ गणेश मंडळ, गोरक्षण वार्ड आणि  बाल गणेश मंडळ, टेकळीचा राजा या मंडळांचाही आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षांनी राजूभाऊ मित्र परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा पुरस्कारांमुळे उत्सव मंडळांमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याची स्पर्धा निर्माण होते. तसेच सामाजिक उपक्रम, आकर्षक सजावट आणि शिस्तबद्ध आयोजनाला प्रोत्साहन मिळून शहरातील उत्सवांची परंपरा अधिक समृद्ध होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी केशव शिपुळकर, चेतन गेडाम, अविनाश पोहणकर, सचिन तोटावार, गुरु कामटे, नरेश गुंडापल्ली, अटल, अभिजीत राऊत, सचिन माकोडे, छगल शाहू, रवि मांतगी, गणपत इटनकर, गोपाल कडेल, श्यामभाऊ झिलपे, संजय झिलेवार, नंदू तिलोकानी, गणेश वनकर, अनिरूप पाटील, हेमंत नुकला, मलेश दारपल्ली, विशाल नारलावार, संतोष बेताल, गोपाल कलवला, विष्णू आरेकर, नकुल मेश्राम यांच्यासह राजूभाऊ मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos