पारधीगुडा येथे पारधी बांधवांना शासकीय दाखल्यांचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ सुलभरीत्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने राजुरा तालुक्यातील मौजा पारधीगुडा (पाचगाव) येथे आज १६ विशेष शिबीर घेण्यात आले. या शिबिरात पारधी बांधवांना विविध शासकीय दाखले, आवश्यक कागदपत्रे व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात पारधी समाजातील नागरिकांना आवश्यक असलेले विविध शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात आली. तसेच दाखले प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अटी व प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. गावातच शासकीय सेवा व मार्गदर्शन उपलब्ध झाल्याबद्दल पारधी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कार्यालयीन अधीक्षक अमोल नवलकर, आदिवासी विकास निरीक्षक रवी निवते, ग्रामविकास अधिकारी महेश मरापे, तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे डी. एम. गेडाम, राजुरा तहसील कार्यालयाचे प्रवीण गावंडे, पाचगावचे सरपंच नामदेव आळे यांच्यासह आरोग्य सेवक, आशा सेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Petrol Price




