महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही शाखा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही शाखा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे बांधणे, २९ नोव्हेंबरचा खासगी संस्थांना वसतिगृहे देणारा निर्णय रद्द करणे, बाहेरगावी शिकणाऱ्या विध्यार्थांना सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करून वर्षाला ८० हजार रूपयांचा लाभ देणे, आदी प्रमुख मागण्यांचा उल्लेख या निवेदनात समावेश होता. केंद्र सरकारने स्वतःच्या निधीतून ५०० कोटी खर्च करून दीड वर्षात वसतिगृहे बांधावी, तसेच सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत ८० हजार रुपये वर्षाला देण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देताना समन्वयक नकटू सोनुले, अध्यक्ष कवडू मांडवकर, उपाध्यक्ष अनिल कंठीवार, सचिव अनिल लोनबले, हेमंत किंदरले, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सीमा सहारे, माजी नगराध्यक्ष आशा गंडाटे, मुरलीधर मँधुळकर, नगरसेवक किशोर भरडकर, भुपेश लाखे, महेश मंडलवार, दीपक शंखपाल, विजय रामटेके, शहर अध्यक्ष महिला काँग्रेस प्रीती सागरे, जयश्री कावळे, रश्मी परसावार उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos