महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज पोलीस विभागाचे दुर्लक्ष : शिरपूर मार्गे जंगल परिसरात अवैधरित्या चालतो जोरात कोंबडा बाजार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा-मोहटोला गावापासून शिरपूर मार्गे दोन किलोमीटर अंतरावर कच्चा रस्त्यावरून डावीकडे वळल्यास आतमध्ये जंगल परिसरात अवैधरित्या कोंबडा बाजार आठवड्यातील रविवार व बुधवार चालत असून कोंबड्यांची पैज लावण्यास शौकीन दूरवरून येत असतात मात्र देसाईगंज पोलीस प्रशासन डोळेझाक करून आम्हाला काही माहीतच नसल्याचे भासवित असल्याने देसाईगंज पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हल्ली गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलोत्पल रुजू होताच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांवर काही काळ लगाम लागले आहे देसाईगंज शहरातील सट्टा- पट्टी अवैध दारू विक्री कोंबडा बाजार व इतर धंद्यांवर काही काळ बंद पुकारण्यात आले आहे मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही अवैधरित्या दारू विक्री सट्टा पट्टी व इतर अवैध धंदे सुरूच आहेत केवळ नावापुरते व देखावा करून चालणार नसून अवैध धंदे पूर्णपणे बंद होणे आवश्यक आहे. कोंबडा बाजारात मोठ्या प्रमाणावर पैस्याची उलाढाल होत असून नवनियुक्त पोलीस अधीक्षक रुजू झाल्याने सध्या काही काळ कोंबडा बाजार बंद ठेवण्यात आले आहे देसाईगंज तालुक्यातील कोंबडा बाजारात बाहेर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली जातात अशातच बाजारात दारूचा ठर्रा सुध्दा उपलब्ध असतो कोंबड्याची पैज हारली की घोटभर दारू पिऊन मन शांत केले जाते कोंबडा बाजार भरवणारे पैज लावणाऱ्यांकडून कमिशन घेऊन आपला बोलबाला करीत असतात कोंबडा बाजार हल्ली बंद ठेवण्यात आले असून कितीकाळ बंद राहणार आहे व कोंबडा बाजार सुरू होताच देसाईगंज पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos