महत्वाच्या बातम्या

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन १०० टक्के अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी केले आहे. 

योजनेच्या लाभासाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील, दारिद्र्यरेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिकाधारक भूमिहीन शेतमजूर असावा. दारिद्र्यरेषेखालील विधवा, परित्यक्ता व घटस्फोटीत स्त्रिया तसेच अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा कुटुंब तसेच तृतीयपंथी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नागपूर येथील कार्यालयातून अर्ज प्राप्त करावे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.





  Print






Related Photos