दारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
स्थानिक नेहरू विद्यालया समोर आज २८ सप्टेंबर रोजी दारू तस्करी करणाऱ्यांकडून चिमूर पोलिसांनी ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे .  नितेश उर्फ़ बालू मोहन विघ्ने (३२) रा, कमल चौक, नागपुर असे आरोपीचे नाव आहे . 
 काल रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद मड़ामें यांच्या मार्गदर्शनात टाटा सूमो क्रमांक एम् एच २६ - सी-४०३५ या वाहनाचा पाटलाग करुण गाडीची पाहणी केली असता सदर वाहनात ३ लाख ६६ हजार किमतीच्या देशी दारुच्या १६ नग खरड्याचे  खोके आढळून आले .  व आरोपीला अटक करण्यात आली.  
सदर कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद मड़ामें यांच्या मार्गदर्शनात पोहवा प्रमोद चिंचुलकर, नापोशि, किशोर बोढ़े, नापोशि कैलास वनकर, पोशि प्रमोद गुट्टे आदींनी  पार पाडली. 
   Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-28


Related Photos