चामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले


- योग्य देखभाल होत नसल्याचा परिणाम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभर धावणाऱ्या अनेक बसेस भंगार अवस्थेत आहेत. नवीन बसगाड्या दाखल होत नसल्याने भंगार झालेल्या बसेसच्या भरवशावरच प्रवाशांची ने - आन रापमंद्वारे केली जात आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्ह्यात अनेकदा बसेसचे अपघात घडत आहेत. आता तर चक्क चालत्या बसची मागील दोन्ही चाके निखळली. यामुळे अपघात होता होता टळला. 
गडचिरोली आगाराची एमएच ०७ सि ९०८० क्रमांकाची बस सकाळी मुलवरून चामोर्शीकडे येत होती. दरम्यान दोटकुली गावाजवळ आल्यानंतर बसची मागील दोन्ही चाके अचानक निघाली. यामुळे बस रस्त्यावर आदळली. डिझेलची टाकी फुटल्यामुळे डिझेल रस्त्यावर पसरले. यावेळी सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. याआधीसुध्दा अनेकदा बसची चाके निखळलेली आहेत. तसेच गडचिरोली येथे काही महिन्यांपूर्वी एका बसची डिझेलची टाकी बसपासून वेगळी होत रस्त्यावर कोसळली होती. यामुळे बसची योग्यरित्या देखभाल केली जात नाही काय, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos