महत्वाच्या बातम्या

 रेल्वे अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा ते चितोडा रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात आनंदनगर येथील रहिवासी शाकीन अब्दुल रब्ब ५५ वर्षे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाकीन अब्दुल रब्ब या त्यांच्या लहान बहिणीच्या घरी घरकामासाठी गेल्या होत्या. घरकाम करत असताना रेल्वे मार्गाजवळ त्यांचा अपघात झाला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने शाकीन यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे आनंदनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शाकीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.





  Print






Related Photos