महत्वाच्या बातम्या

 येरंडी-खुर्द येथे २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या येरंडी-खुर्द येथे एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  दुपारच्या सुमारास घडली. विकास सुरेश दोनोडे २७ वर्षे रा. येरंडी-खुर्द असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विकास याने बुधवारी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान घरातील बेडरूममधील सीलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी शालिकराम सिताराम दोनोडे ५६ वर्षे रा. येरंडी-खुर्द यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





  Print






Related Photos