महत्वाच्या बातम्या

 राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी लोक बिरादरी हेमलकसाच्या दहा खेळाडूंची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : ता.५-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडली. यामध्ये लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील खेळाडूंनी सुंदर प्रदर्शन करून घवघवीत यश मिळविले.

नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथे ३ व ४ आक्टोबर २०२६ ला झालेल्या विभागीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील १४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले. ३० आक्टोबर व १ नोव्हेंबर २०२६ ला ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.१४ ,१७ व  १९ वर्ष वयोगटातील १० खेळाडू विद्यार्थ्यांनी घवघवीत प्रावीण्य प्राप्त केले. 

यामध्ये १४ वर्ष( मुले) प्रयाग सचिन मुक्कावार, माउली गणेश हिवरकर.१७ वर्ष ( मुले) बलदेव राजू महाका, रोहित चंदू महाका, पियुष रमेश कांदो. १९ वर्षे ( मुले) अर्जून लिंगू आलामी, ओमकार संजय मडावी यांनी मल्लखांब खेळ प्रकारात प्राविण्य मिळविले. तर रोप मल्लखांब स्पर्धेत १७ वर्षे ( मुली) कोमल प्रकाश पुंगाटी. १९ वर्षे ( मुली) संगिता सखाराम पुंगाटी, उर्मिला झुरू ताडो यांचा समावेश आहे.

जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे, लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोक बिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी मल्लखांब प्रशिक्षक परमात्मा पंधरे व प्रावीण्य प्राप्त  विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos