गिधाड पक्षी सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत, त्यांचे संरक्षणातच मानवी अस्तित्वाची हमी आहे!


आंतरराष्ट्रीय  गिधाड जागृती दिन दि. १ सप्टेंबर २०१८ 
वनविभागाकडून आवाहन 
सन 1991 - 92 मध्ये भारतात झालेल्या पक्षी प्रगणनेत गिधाड पक्षी 40 दशलक्ष इतक्या अवाढव्य संख्येने अस्तित्वात होता. सन 1992 ते 2007 या काळात जवळपास 99.9 टक्क्याने गिधाड पक्षांची संख्या कमी झाली आहे.
गिधाड पक्ष्यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आपण काय करू शकतो ?
- आपल्या परिसरात गिधाड पक्षी दिसताच नजीकच्या वनविभाग कार्यालयात / वनकर्मचारी / गिधाड मित्र यांना माहिती द्या.
- मृत पाळीव जनावरे गाय/ बैल/ म्हैस/ रेडा या जनावरांना कसायाकडे न देता गिधाडांकरीता तयार करण्यात आलेल्या गिधाड उपहारगृहात देण्यात यावे. (प्रती पाळीव जनावर रू. 500/-)
- मृत पाळीव जनावर गिधाड उपहारगृहात देण्यापूर्वी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून मृत जनावराची तपासणी करून डायक्लोफेनॅक वा तत्सम औषधांचा वापर केला नसल्याचे निश्चित करावे.
- जंगलातील / आपल्या परिसरातील उंच झाडांची तोड करू नका.
- झाडावर गिधाडांचे घरटे आढळून आल्यास त्यास इजा पोहचवु नका. कारण मादा गिधाड एकदा केवळ एकच अंड देते. गिधाड पक्षी तब्बल 4 ते 5 वर्षानंतर पुर्ण वाढ होवून प्रजननास योग्य होतो.
- पाळीव जनावरांना वेदना कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी डायक्लोफेनेक तसेच तत्सम औषधांचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत नजीकचे वनविभाग कार्यालयास माहिती द्यावी
- गिधाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाला नेहमी सहकार्य करा. पृथ्वीवरील  पर्यावरण रक्षणासाठी जेवढे वृक्ष महत्वाचे आहेत, तेवढेच गिधाड पक्षीसुध्दा महत्वाचे आहेत.
 - विनित
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली / उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली/ समस्त अधिकारी व कर्मचारी (वृंद)

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-01


Related Photos